Athavanichya Lata Vegalya Wata | आठवणींच्या लाटा वेगळ्या वाटा

Athavanichya Lata Vegalya Wata | आठवणींच्या लाटा वेगळ्या वाटा
सुषमा जावडेकर यांनी फॅमिली फिजिशियन म्हणून व्यवसाय करत असताना. फुरसतीच्या काही क्षणी निरनिराळ्या देशांना भेटी दिल्या त्याची प्रवास वर्णने या पुस्तकात केली आहेत. सर्वसाधारणपणे विदेशी सहल म्हणजे प्रवाशांचा ओढा युरोप अमेरिका, थायलंड, सिंगापूर किंवा दुबई येथे असतो पण लेखिकेने काही 'हटके देश' निवडून त्याची प्रवासवर्णने लिहिली आहेत. प्रवास करत असताना लिहिलेल्या काही संक्षिप्त टिपणांचा उपयोग करून त्यांनी अत्यंत रोचक शब्दात सहलीची वर्णने केली आहेत. ती वाचून वाचकांना त्या देशात खरोखरच फिरून आल्याचे समाधान व आनंद मिळेल यात शंका नाही. ह्या वेगळ्या वाटांचा फेरफटका रंजक वाटेल हे निश्चित !