Athavaninchya Payvata | आठवणींच्या पायवाटा

Athavaninchya Payvata | आठवणींच्या पायवाटा
वि. शं. चौघुले सहृदय समीक्षक, कुशल मुलाखतकार आणि मध्ययुगीन संतसाहित्याचे साक्षेपी अभ्यासक आहेत. हा आत्मपर लेखांचा संग्रह त्यांच्या आधीच्या लेखनापेक्षा वेगळा आहे. प्राथमिक-माध्यमिक-महाविद्यालयीन शिक्षणाचे आणि अध्यापन व्यवसायातील अनुभवांचे प्रांजळ कथन त्यांनी लेखांत केले आहे. विविध महाविद्यालयांतील सहकार्यांचे स्वभावधर्म, विद्यार्थी-विद्यार्थिनींचे बहुरंगी विश्व आणि आयोजित केलेल्या कार्यक्रमांच्या निवेदनासोबत मुंबईतील नामवंत डॉक्टरांची आणि भिन्नधर्मी शेजार्यांची हृद्य व्यक्तिचित्रे चौघुले यांनी रेखाटली आहेत. मुंबई शहराचे, महाराष्ट्रातील आणि भारतातील पर्यटनस्थळांचे आणि दूरदर्शनसाठी घेतलेल्या मुलाखतीचे रोचक वर्णन हा लेखसंग्रहाचा ठळक विशेष आहे. कोकणातील विवाहसमारंभाच्या स्मृतींत रमणार्या लेखकाचे धर्मचिंतन अंतर्मुख करणारे आहे. निवेदनशैली अनलंकृत, साधी व प्रवाही आहे. करुण गंभीर व विनोदी प्रसंगांची डूब निवेदनाला लाभली आहे. या पुस्तकामध्ये एका बहुश्रुत, संवेदनशील, माणूसलोभी 'मी'चा प्रत्यय येतो. वि. शं. चौघुले ह्यांच्या लेखनाचे तेच बलस्थान आहे.