Athavanitalya Kavita Part |1) | आठवणीतल्या कविता भाग |१)

Athavanitalya Kavita Part |1) | आठवणीतल्या कविता भाग |१)
शाळेत शिकलेल्या कवितांबद्दलच्या मधुर हुरहुरीतुन मधुर (नॉस्टाल्जिया) ‘आठवणीतल्या कविता’ या संग्रहाची आठवण आली. दूर, सातासमुद्रापलिकडे अमेरिकेत वास्तव करणार्याल कुणा आजोबाला आपल्या नातवासाठी ‘पंडुं आजारी’ ही कविता हवीशी झाली आणि तिव्हा इथं शोध घेताना हे ‘मौजे’चं आजारपण इथंही पसरलं...सगळीकडे आठवणींचे पिंपळ शाळेतल्या कवितांनी सळसळले...त्या पिंपळांवर कवितांची शाळाच जमली...छंद म्हणून कुणी त्यांचं संकलन. केलं.‘ज्यांचं त्यांना अर्पण करावं’ रसिकनिष्ठ भावनेतून कुणाला संग्रहाची कल्पना सुचली. हा सगळा व्यवहार हळुवार प्रेमाचा व्हावा यासाठी कुणी ‘आठवण’ या अव्यावसायिक प्रकाशन-संस्थेची कल्पना काढली... साराच वेड्यांचा बाजार !