Atreprahar | अत्रेप्रहार
Atreprahar | अत्रेप्रहार
दैनिक 'मराठा'मधून प्रसिद्ध झालेल्या आचार्य अत्रे यांच्या काही वैशिष्ट्यपूर्ण अग्रलेखांचा हा संग्रह. आचार्य अत्रे यांनी दैनिक 'मराठा'मधून दोन प्रकारचे लेखन केले. उदात्ततेची पूजा करणारे, भावभक्तीने ओथंबलेले, तसेच ढोंगावर, अन्यायावर, समाजविघातक प्रवृत्तींवर कडाडून, तुटून हल्ला करणारे, तिरस्काराने गदगदून भरलेले. त्यांच्या लेखणीने कधी ओव्या म्हटल्या आणि कधी शिव्याही हासडल्या. ओव्या गायल्या त्या काव्यसौंदर्याने दरवळलेल्या आणि शिव्या हासडल्या त्याही अगदी अस्सल आणि ठेवणीतल्या. 'मोजून पैजारा माराव्या' तश्या.हे प्रहार वाचकांना नक्कीच वाचनीय वाटतील.