Australia Ek Pudharlela Atiprachin Desh | ऑस्ट्रेलिया एक पुढारलेला अतिप्राचीन देश

Kalyani Gadagil | कल्याणी गाडगीळ
Regular price Rs. 144.00
Sale price Rs. 144.00 Regular price Rs. 160.00
Unit price
Australia Ek Pudharlela Atiprachin Desh ( ऑस्ट्रेलिया एक पुढारलेला अतिप्राचीन देश ) by Kalyani Gadagil ( कल्याणी गाडगीळ )

Australia Ek Pudharlela Atiprachin Desh | ऑस्ट्रेलिया एक पुढारलेला अतिप्राचीन देश

About The Book
Book Details
Book Reviews

ऑस्ट्रेलियात एकीकडे पराकोटीचा रूक्ष असा वाळवंटी प्रदेश आहे, तर दुसरीकडे भर दिवसा सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोचू शकणार नाही अशा घनदाट जंगलाचा (रेनफॉरेस्ट) प्रदेश आहे. जगातील सर्वांत सुंदर व आसपासच्या अगदी सपाट भूभागातून, जमिनीतून आश्चर्यकारकपणे वर आलेला एकसंध, केशरी रंगाने उन्हात रसरसणारा खडक ‘उलरू’ येथे आहे. जगातील सवाधिक विषारी असलेल्या सर्पांपैकी दहा अतिविषारी सर्पांची जन्मभूमी व वस्ती येथे आहे. भयानक सर्पच नव्हे तर अतिविषारी कोळी, मरणवेदना परवडली अशा वेदना नुसत्या स्पर्शासरशी देणारे ‘बॉक्स जेलीफिश’ नावाचे जलचर, ‘ब्ल्यू रिंग्ड ऑक्टोपस’ नावाचा भयानक विषारी जलचर (जो चावला तर श्वसन अशक्य होऊन माणूस मरतो), ‘पैरालिसिस टिक्स’ नावाच्या एका प्रकारच्या पिसवा (ह्या चावल्यास अर्धांगवायू होऊ शकतो), समुद्रात किंवा तळयात पोहायला गेले असता मगरीने हल्ला चढविला किंवा मगरीमुळे मृत्यू अशा बातम्या देणारी वृत्तपत्रे… सगळेच विस्मयकारक! मुळात ब्रिटीशांनी १७८७ साली गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी तुरूंग म्हणून निवडलेला हा त्यावेळचा पूर्णत: अपरिचित भूप्रदेश. या देशाची सुरूवातच ‘तुरुंग’ या बदनामीने झालेली. पण त्यानंतर या खंडाचा शोध घेणार्‍या धाडसी मानवांच्या थक्क करणार्‍या साहसी सफरी, या देशाने केलेली औद्योगिक प्रगती, हार्बर ब्रिज व सिडनी ऑपेरा हाऊस सारख्या मानवी अभियांत्रिकी व कलेचे दर्शन घडविणार्‍या अप्रतिम कलाकृती.

ISBN: 978-8-17-421015-9
Author Name: Kalyani Gadagil | कल्याणी गाडगीळ
Publisher: Continental Prakashan | कॉन्टिनेन्टल प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 136
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products