Avadhya |अवध्य

Avadhya |अवध्य
हे नाटक 70 च्या आसपास लिहिले गेले आहे. तो काळ असा होता की जेव्हा लैंगिक गोष्टींबद्दल उघड चर्चा करण्यास किंवा त्याबद्दल भाष्य करण्यास समाजात लज्जास्पद समजले जाई. प्रत्येकजण सभ्य असल्या सारखा वागायचा , किमान त्याचा दृष्टीकोन तसा दाखवला जायचा परंतु वैयक्तिक जीवनात ती व्यक्ती भिन्न असायची. अशा काळामध्ये लेखक आपली कादंबरी पूर्ण करण्यासाठी सुट्टीवर गेला आहे. तिथे त्याला काही लोक भेटतात या लोकांचे नग्नता ,लैंगिकता याबद्दल असणारे विचार आणि लेखकाचे नग्नता ,लैंगिकता याबद्दल असणारे (नैतिक) विचार यात अतिशय तफावत असते. त्यातून काय काय नाटय निर्माण होते हे दाखवणारी ही नाटयकृती आहे.