Avkash - Kalacha Tapaswi : Albert Einsten | अवकाश - काळाचा तपस्वी : अल्बर्ट आइन्स्टाईन

Avkash - Kalacha Tapaswi : Albert Einsten | अवकाश - काळाचा तपस्वी : अल्बर्ट आइन्स्टाईन
नोबेल पारितोषिकविजेता डॉ. अल्बर्ट आइन्स्टाईन हा जर्मनीतील एका सर्वसाधारण कुटुंबात जन्मलेला मुलगा ! अल्बर्ट हा केवळ सैद्धान्तिक भौतिकशास्त्रज्ञ नव्हता; तर एक उत्तम व्हायोलिनवादक व तत्त्वज्ञ होता.जर्मनीत हिटलरची हुकूमशाही सुरू होताच नाझी लोक त्याच्या जीवावर टपले व त्याला आपल्या जन्मभूमीचा त्याग करावा लागला. भौतिक विज्ञान क्षेत्रात कमावलेल्या अत्युच्च स्थानाचा उपयोग त्याने असंख्य ज्यू निर्वासितांच्या पुनरुत्थानासाठी केला.हे पुस्तक अल्बर्ट आईन्स्टाइनचा एक वेगळा पैलू आपल्या समोर आणतो. दुसऱ्या महायुद्धात लाखो ज्यूंची झालेली ससेहोलपट, अणुबॉम्बची कल्पना, निर्मिती व प्रचीती याचे समग्र व यथार्थ दर्शन घडवणारे हे पुस्तक.