Avvachya Savva | अव्वाच्या सव्वा
Avvachya Savva | अव्वाच्या सव्वा
आतिशयोक्ती हा विनोदाचा आत्माच म्हणायला हवा. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात चिंतेचे, टवाळीचे, नाराजीचे अनेक प्रसंग येत असतात. अनेक महत्त्व-पूर्ण प्रश्नां-संबंधात इच्छा असूनही जन्मजात मध्यमवर्गीय मर्यादांमुळे बोटचेपेणाची भूमिका घेऊन गप्प बसावं लागतं. अशा प्रसंगांना शाब्दिक करामतींचा मसाला आणि थोडी अतिशयोक्तीची फोडणी दिली, की विनोदी कथांची बरी डिश तयार होते. अव्वाच्या सव्वा वाचताना प्रकर्षाने जाणवणारी ही गोष्ट.या कथांमध्ये मूलगामी चिंतन वगैरे कोणी शोधू पाहील, तर त्याला ते सापडायचं नाही, पण दोन घटका मजेत घालवायला या अव्वाच्या सव्वा कथा नककीच चांगल्या आहेत.