Ayurvedachya Drushtikonatun Arogysampanna Santati : |Part 1 Ani 2 | आयुर्वेदाच्या दृष्टीकोनातून आरोग्यसंपन्न संतती : | खंड १ आणि २

Ayurvedachya Drushtikonatun Arogysampanna Santati : |Part 1 Ani 2 | आयुर्वेदाच्या दृष्टीकोनातून आरोग्यसंपन्न संतती : | खंड १ आणि २
पूर्वीच्या काळी दांपत्याला प्रजननविषयक कोणत्याही समस्यांकरिता सर्वसाधारणपणे खास आरोग्यतज्ज्ञ यांनी सुचविलेल्या औपचारिक औषधोपचाराविषयक साह्याची वा औपचारिक आहारविहार, समागम इत्यादि संदर्भात बाह्य शिस्तीची गरज नव्हती. परंतु आता परिस्थिती अत्यंत वेगळी असल्यामुळे एकविसाव्या शतकातील आधुनिक जनसामान्यांना सुप्रजनन समस्येसंदर्भात, आहारविहार, समागम इत्यादींबाबत औपचारिक औषधोपचाराविषयक साह्याची तसेच ह्या जोडीला आरोग्यतज्ज्ञ निर्देशित शिस्तबद्ध जीवनाची अनिवार्य आवश्यकता आहे. ह्या गोष्टींबाबत जनसामान्यांमध्ये आता सजगता निर्माण झालेली आहे. त्या दृष्टीने अशा दांपत्यांना सुप्रजा-निर्माण-प्रयोगाला मार्गदर्शन करणारे विचार आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून आरोग्यसंपन्न संतती ह्या ग्रंथात व्यक्त केलेले आहेत व हे विचार निश्चितच मार्गदर्शक होतील.