Ayurvediya Soundaryamantra | आयुर्वेदीय सौंदर्यमंत्र

Ayurvediya Soundaryamantra | आयुर्वेदीय सौंदर्यमंत्र
' सौंदर्य ' या स्वयंभू प्रवृत्तीचे आपण सारेच उपासक आहोत. अनादी काळापासून आपल्या निसर्गदत्त रूपाला सजवून अधिक सुंदर दिसण्याचा प्रयत्न मनुष्य करत आला आहे. कोणत्याही अलं.कारांन अवयव भूषित केलेले नसताना देखील ते सजवले आहेत असं वाटणं याला रुप म्हणतात. असं सौंदर्य म्हणजेच नैसर्गिक सौंदर्य. ते कुठल्याही सौंदर्यप्रसाधन शी किंवा वयाशी निगडित नसून केवळ आरोग्याशी निगडित आहे. सुंदर दिसणं ही प्रत्येक मनुष्याची इच्छा असतेच शिवाय तो त्याचा अधिकार देखील आहे. सौंदर्य म्हणजे नक्की काय ते प्राप्त करण्याचे नैसर्गिक सुरक्षित आणि हमखास मार्ग कोणते हे जाणून घ्यायचं असेल तर हे पुस्तक वाचायलाच हवे. या पुस्तकाद्वारे आयुर्वेदाचे सौंदर्य मंत्र सांगितले आहेत.