Ayushya Samruddha Karnare 101 Dhade | आयुष्य समृध्द करणारे १०१ धडे

Ayushya Samruddha Karnare 101 Dhade | आयुष्य समृध्द करणारे १०१ धडे
मग नवन्वीन विचार मनात येत राहतात. आपल्याला नव्याने गोष्टी कळायला लागल्या, की त्यातून अनेक शक्यता निर्माण होतात. या शक्यता केवळ आपल्याला परिस्थितीमुळे काही नवीन धडे शिकायला भाग पडल्यामुळेच निर्माण होतात. आपल्या पूर्वजांनी शेती, समाजव्यवस्था, औषध, अशा अनेक गोष्टी विकसित का केल्या असतील? केवळ आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी. एके काळी आपल्या जगात फक्त भीतीवर मात करण्यासाठी शोधलेल्या वस्तू अंतर्भूत होत्या. " व्यावहारिक संदर्भात सांगायच तर कुठलीही समस्या ही तुमची समज वाढवणारी समृध्द करणारी असते हा विचार मनात जोपासून आयुष्य अधिक चांगल्या प्रकारे घडवल तर तुम्ही त्रासाच्या दु:खाच्या चक्रव्यूहाला भेदून आयुष्यात भरभराट करायला शिकाल."