Ayushyache Dhade Giravtaana | आयुष्याचे धडे गिरवताना

Ayushyache Dhade Giravtaana | आयुष्याचे धडे गिरवताना
आयुष्याच्या प्रवासात आपल्याला विविध प्रकारच्याव्यक्ती भेटतात,अनेक घटनाप्रसंगांना सामोरे जावे लागते. त्यातून वेगवेगळे अनुभव येतात. त्यातले काही अनुभव चांगले असतात, काही घटना वाईट.काही सुखकारक असतात, तर काही दु:खदायक.काही व्यक्ती चमत्कारिक असतात, तर काही अनुभव मन थक्क करणारे हे अनुभव,या व्यक्ती आपल्याला बरेच काही शिकवून जातात. आपले आयुष्य विविध अंगांनी संपन्न करतात परिपक्व बनवतात. या संग्रहात सुधा मूर्ती यांनी याअनुभवांना आणि व्यक्तिरेखांना कथारूप दिले आहे. या कथा जशा सुधा मूर्ती यांच्या आहेत, तशा त्या तुमच्या आमच्या आहेत; विलक्षण चमत्कृतींनी भरलेल्या, गुंतागुंतीच्या जीवनाविषयीच्या आहेत. सहजसोप्या कथनशैलीतून उलगडत जाणाया या कथा आयुष्याचे धडे देतात अंतर्मुख करतात.