Badalta Bharat | बदलता भारत

Badalta Bharat | बदलता भारत
जागतिकीकरणाने देशाच्या सर्वांगीण प्रगतीला कितपत चालना दिली आहे? की विषमतेची दरी आणखी वाढली आहे? जागतिकीकरणासंदर्भात भिन्न भूमिका असलेले लोक या दोन्ही बाजूंनी खल करतात. लेखक श्री. काळे या दोन्ही बाजूंत अडकून पडत नाहीत. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे समाजजीवनावर झालेला परिणाम, त्याची दिशा याचा शोध घेतात.लेखक भानू काळे यांनी यासंदर्भात आपले मत बनवण्यापूर्वी स्वत: फिरून पाहायचे, लोकांशी बोलायचे, असे ठरवून केरळपासून आसामपर्यंत भ्रमंती केली. या शोधयात्रेत जे ठळकपणे बदल दृष्टीस पडले, ते त्यांनी मांडले आहेतच; पण समाजजीवनात सूक्ष्मपणे घडत असलेल्या परिवर्तनाचे पोतही त्यांनी सहजतेने उलगडून दाखवले आहेत. यासाठीच 'बदलता भारत' हे पुस्तक महत्त्वाचे आहे.