Bahurupini : Durga Bhagvat |Charitra Ani Chitra) | बहुरूपिणी : दुर्गा भागवत |चरित्र आणि चित्र)

Bahurupini : Durga Bhagvat |Charitra Ani Chitra) | बहुरूपिणी : दुर्गा भागवत |चरित्र आणि चित्र)
दुर्गा भागवत यांच्या असामान्य आणि गूढरम्य व्यक्तिमत्त्वाचं गारूड मराठी मनावर आहे. दुर्गाबाई नक्की कशा होत्या हे समजावं म्हणून, त्यांची मैत्रीण बनून, त्यांना जाणून घेत अंजली कीर्तने यांनी केलेली ही शोधयात्रा. ओघवत्या, चित्रमय आणि सौष्ठवपूर्ण शैलीतून प्रकटणारी. आधी लघुपटाच्या माध्यमातून आणि आता शब्दमाध्यमातून दुर्गाबाईंच्या जीवनातील अनुत्तरित प्रश्नांचा कसून घेतलेला शोध नातेसंबंधांचे बहुस्तरीय व सूक्ष्म विश्लेषण, त्यांच्या जडणघडणीचा वेध आणि यामागे उभं असलेलं अनेक वर्षांचे सखोल संशोधन, यांतून साकार झाला आहे एक नयनरम्य कॅलिडोस्कोप. दुर्गाबाई एक की अनेक असा संभ्रम पडावा, अशी त्यांची अनेक विलोभनीय, प्रेरक आणि आनंदमय रूपं या ग्रंथातून प्रत्ययाला येतात.