Baimanus | बाईमाणूस

Baimanus | बाईमाणूस
भारतीय बाईच्या आयुष्यात स्त्रीमुक्ती याचा दुसरा अर्थ पुरुषमुक्ती असाच आहे. भारतीय स्त्रीचे जगणे, तिच्या नव्या युगातील आशा आकांक्षा आणि स्त्रीमुक्तीचा अर्थ हे सारे समजावून घेण्यासाठी या पुस्तकाची निर्मिती झाली. स्त्रीमुक्ती या विषयाकडे समाजात बर्याचदा कुचेष्टेने पाहिले जाते, असे लेखिकेने म्हटले आहे. ती नजर दूर व्हावी, असा प्रयत्न पुस्तकात केला आहे. बाईचे दुय्यमत्व जणू काही निसर्गनिर्मित वाटावे, इतके नसानसात भिनले आहे. ते स्त्री तसेच पुरुषांच्या असण्यातून खेचून बाहेर काढणे, मुळीच सोपे नाही. खरेतर स्त्रीमुक्ती म्हणजे 'मानवी समानता'च. पण महिलांबाबत सुबुद्धांना जणू गृहितच असणारी समानता प्रत्यक्षात मात्र येत नाही. गोखले यांनी स्त्रीमुक्तीचा रोजच्या जगण्याशी जो संबंध आणून ठेवला आहे, तो सर्वांत महत्त्वाचा आहे. ते निकष लावले तर प्रत्येक पुरुषाला आत्मपरीक्षण करता येईल. अनेक महिलांची मनोगते व मुलाखती हा या पुस्तकाचा आणखी एक वेगळेपणा!