Banco | बॅंको

Banco | बॅंको
पॅपिलॉन ही हेनरी शॅरियरची मूळ फ्रेंच भाषेत प्रसिद्ध झालेली आत्मकथा. एका नव्या जगाची ओळख करून देणारे सरळ, ओघवत्या पण सामथर्यवान शब्दातील जिवंत अनुभवांचे दर्शन ’पॅपिलॉन’ मध्ये घडते. जबरदस्त आत्मविश्वास आणि बळकट शरीरसंपदा या दोन दैवी देणग्यांचे जोरावर एक माणूस आयुष्यात किती प्रचंड साहसे करू शकतो, हे पॅपिलॉनवरून समजेल. या पुस्तकाची जगातील सर्व प्रमुख वृत्तपत्रांनी एकमुखाने स्तुती केली आहे. विक्रीचे जुने उच्चांक या पुस्तकाने मोडले आहेत. त्यावर ’पॅपिलॉन’ नावाचा चित्रपठी निघाला आहे. तेरा वर्षांच्या तुरुंगवासात पॅपिलॉनने आठ वेळा पळून जाण्याचे प्रयत्न केले; पण ते अयशस्वी ठरले. पुढच्या खेपेला तो समुद्रमार्गे पळाला - अनंत अडचणी, पोलिसांचा ससेमिरा आणि धाडसाची परंपरा यांमधून तो ’व्हेनेझुएला’ देशात पोचला. अखेर त्या देशाने पॅपिलॉनला आश्रय दिला. ’बॅंको’ हा स्वतंत्र पॅपिलॉनच्या साहसांचा आणि संकटाचा इतिहास आहे. वाचकांना तो ’पॅपिलॉन’ इतकाच आनंद देईल, अशी अपेक्षा आहे.