Band Khidakibaher | बंद खिडकीबाहेर

Band Khidakibaher | बंद खिडकीबाहेर
'बंद खिडकीबाहेर' हे ललित लेख म्हणजे प्रवासवर्णने आहेत. दिवाळी अंकातील लेखांचा हा संग्रह आहे. भारत आणि परदेशांतील अनेक ठिकाणे त्यांनी बघितली.त्या साऱ्यांचे त्यांनी अत्यंत संवेदनशीलतेने वर्णन केले आहे.आपल्या प्रवासात त्यांनी काही लेखकांच्या शहरालाही भेट दिली. त्यांच्या लेखनात केवळ स्थळांची वर्णने नाहीत, तर तिथली संस्कृती, लोकजीवन, आदीचा तपशील येतो. तसेच नृत्यकला आणि शिल्पकला याचीही माहिती येते. संगीत, चित्रकला या विषयांची माहिती देत त्या प्रवासाचे वर्णन करतात, त्यामुळे केवळ प्रवासवर्णनपर लेख, इतकेच स्वरूप या लेखांना राहत नाही. लेखिकेने लेखनाचा वेगळा प्रयोग केला असून, तो वाचनीयही झाला आहे.