Bandh - Anubandh | बंध - अनुबंध

Bandh - Anubandh | बंध - अनुबंध
कमल पाध्ये यांनी त्यांच्या आयुष्यातल्या घडामोडी, त्यातून निर्माण होणारे भावभावनांचे आणि नात्यागोत्यांचे गुंतागुंतीचे बंध-अनुबंध आणि साहजिकच त्यांतून उद्भवणार्या समस्या या पुस्तकात मांडल्या आहेत. नात्या-गोत्यांचे बंध-अनुबंध मांडणारे आत्मकथन स्त्रीमनाची संवेदनशीलता, अन्याय-असमानतेच्या वागणुकीमुळं होणारी स्त्रीमनाची घुसमट, माणसांची नाती-गोती, त्यातून निर्माण होणारे भावबंध ह्यांचं हृद्य चित्रण असलेलं हे पुस्तक. स्नेह, वात्सल्य, दु:ख, समस्या, गुंतागुंत ह्या सगळ्याबद्दल चिंतनपर मतं व्यक्त करत, स्वत:चे जीवनानुभव प्रांजळपणे मांडणारं हे स्त्री-आत्मकथन वाचकांच्या मनाचा ठाव घेतं.