Banubai |Dr. Banoo Coyaji) | बानुबाई |डॉ. बानू कोयाजी)

Banubai |Dr. Banoo Coyaji) | बानुबाई |डॉ. बानू कोयाजी)
बानूबाईंनी आपल्या कार्यकाळात ४० रुग्णव्यवस्थेच्या केईएम हॉस्पिटलचा विस्तार ५५० रुग्णव्यवस्थेइतक्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये केला. शिवाय वैद्यकीय क्षेत्रांतील नवनवीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी, समस्या निराकरणासाठी त्यांनी केईएम रिसर्च सेंटरची स्थापना केली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना आरोग्यसेवेपासून वंचित राहावे लागू नये, यासाठी सोशल वर्क डिपार्टमेंटची स्थापना केली. ग्रामीण भागातील लोकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवण्यासाठी त्यांनी ग्रामीण आरोग्य क्षेत्रात नमुनादर्श ठरेल असा प्रकल्प वढू येथे राबवला. बानूबाईंचे महत्त्वाकांक्षी आणि सहृदयी व्यक्तिमत्त्व, बानूबाईंनी आपल्या कार्यकाळात मोठी कामे कशी उभी केली याचे चित्रण डॉ. प्रतिभा कुलकर्णी लिखित ‘बानूबाई' या पुस्तकातून उलगडते.