Bapmanus | बापमाणूस

Bapmanus | बापमाणूस
दिलीप प्रभावळकर, मेघना पेठे, सदाशिव अमरापूरकर, दत्तप्रसाद दाभोळकर, जयंत पवार, राजू परूळेकर, युवराज मोहिते, मेधा कुलकर्णी , निखिल वागळे ही सगळी विजय तेंडुलकरांच्या निकट मित्रवर्तुळातली मंडळी. या सर्वांची कार्यक्षेत्रं वेगळी, त्यांची पिंडप्रकृती वेगळी. या लेखक, अभिनेते, पत्रकार मंडळींना त्यांच्या नजरेतून तेंडुलकर कसे दिसले; तेंडुलकरांच्या भेटीगाठीत त्यांना काय अनुभव आले; तेंडुलकरांचा त्यांच्याशी काय प्रकारचा संवाद चालत असे हे नीट शब्दात गोळा करून तेंडुलकरांचं थ्री-डायमेन्शनल व्यक्तिमत्व वाचकांसमोर उभं करायचं काम पत्रकार निखिल वागळे यांनी केले आहे. 'बापमाणूस' असं चपखल शीर्षक असलेल्या या पुस्तकाचं संपादन पत्रकार निखिल वागळे यांनी अत्यंत काटेकोरपणे केलं आहे.