Barack Obama | बराक ओबामा

Barack Obama | बराक ओबामा
बदलत्या जगाचा सक्सेस पासवर्ड ....म्हणजे बराक ओबामा. ओमाबांच्या चार दशकांच्या आयुष्याचा उत्तुंग आलेख लेखक संजय आवटे यांनी आपल्या या पुस्तकात ज्या हृद्य शैलीने पेश केला आहे की हे पुस्तक वाचताना आपण अक्षरश: तळापासून हलतो. एवढ्या अल्पशा वयात बराकने काय काय भोगले आणि शेवटी मनात कसलाही विशाद न ठेवता तो वंश आणि रंगभेदी अमेरिकेला नामोहरम करून अमेरिकेचा पहिला कृष्णवर्णीय अध्यक्ष म्हणून निवडून कसा येऊ शकतो याचे आश्चर्य वाटत राहते. आई-आजी-आजोबा अमेरिकेतील गोरा, काळा समाज याचे करुण ज्वलंत चित्र लेखकाने ओबामांच्या चरित्रात उभे केले आहे. ते आपल्या देशात जातीवादाची लढाई करणार्या प्रत्येकाला स्फूर्ती देणारे ठरावे इतके महत्त्वाचे आहे.