Bari | बारी

Bari | बारी
हि कादंबरी म्हणजे सुरेख शहरी कुंडीत लावलेलं खेडेगावातल फुलझाड नाही. प्रसंगाचा, निसर्गाचा, भावविश्वाचा, भाषाशैलीचा आणि या जीवनावर जिची छाया पडली आहे, त्या समस्येचा अस्सलपणा या कादंबरीत अधिक प्रमाणात आहे. या ग्रामीण जीवनात जी सामाजिक, आर्थिक, राजकीय, यांत्रिक, शैक्षणिक अशी सर्वंकष स्थित्यंतरे होत आहेत, ती सारी कधी विकट हास्य करीत, तर कधी कारुण्यान काजळून जात लेखकापुढे प्रकट होत आहेत. या जीवनाविषयी त्याला आपुलकी आहे, जिव्हाळा आहे, पोटतिडीक आहे. या जीवनाचाच एक लहानसा भाग असलेलं, बेरड जमातीचं परंपरागत जीवन, त्या जीवनात होऊ घातलेली स्थित्यंतरे आणि त्या जमातीच्या भाविताव्याविषयीची काळजी या सर्वांतून `बारी` स्फुरली आहे, फुलली आहे.