Baromas | बारोमास

Baromas | बारोमास
शेतकर्यांच्या जीवनाला बारोमास वेढून असणाऱ्या जन्मजात वेदनेचा हुंकारातून ही कादंबरी आकाराला आली आहे. ही एक महान शोकांतिका आहे. उत्कट होत जाणारा नाटकाचा शोकानुभव ही कादंबरी देते. भारतीय समाज व्यवस्थेच्या अंतर विरोधाची, राजकीय शक्तीच्या भ्रष्टाचारी आत्मकेंद्रिततेची, सांस्कृतिक -हासाची ही करूण कथा आहे. ही कादंबरी वाचताना जाणवतं मराठी ग्रामीण साहित्य सर्व स्तरावरच्या भाविक कृतक मोह बंधनातून बाहेर येऊन विदारक, भयावह वास्तवाचं दर्शन घडवित आहे. सदानंद देशमुख जितक्या सामर्थ्याने बाह्य वास्तवाच्या प्रतिकूलतेच चित्रण करतात तितक्याच ताकदीने माणसाच्या अंतर्मनाचा ही वेध घेतात.