Batamimagchi Batami | बातमीमागची बातमी

Batamimagchi Batami | बातमीमागची बातमी
ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश प्रधान यांचे हे पुस्तक वाचताना असे खास अनुभव वाचायला मिळतात. कोणतीही विशेष बातमी मिळवण्यामागे पत्रकाराची चिकाटी, कौशल्य, दूरदृष्टी आणि कल्पकता पणाला लागते. प्रधान यांनी अशाच काही घटना पुस्तकात वर्णिल्या आहेत.अतिरेक्यांच्या अटकेचे थरारनाट्य, धगधगत्या पंजाबमधील जिवंत अनुभव, बालमृत्यू, आदिवासींचे भीषण जळीतकांड अशा वेगवेगळ्या घटनांची बातमी कशी झाली, याचा वृत्तांत ते सांगतात. याशिवाय काही 'हटके' अनुभवही वाचकांसमोर मांडतात. सध्याच्या 'सबसे तेज' पत्रकारितेत वावरणाऱ्यांसाठी आणि बातमीबद्दल उत्सुकता असणाऱ्या सर्वांसाठीच आवर्जून वाचावे, असे लेखन.