Batatyachi Chal | बटाट्याची चाळ

Batatyachi Chal | बटाट्याची चाळ
बटाट्याची चाळ अजून उभीच आहे. ऊन खात, पाऊस पचवीत, समोरच्या नवीननवीन इमारतींना तोंड देत उभी आहे. खिडक्यांचे आणि कठड्यांचे लाकडी गज अर्ध्यांहून अधिक उडालेले आहेत. जिने आपली पायरीसोडून वागायला लागले आहेत. भल्याभल्यांचे पाय येथे घसरू लागले आहेत. भिंतींचे पोपडे उडाले आहेत. रंग तर कित्येक वर्षांपूर्वीच उडाला. खूप वर्षं झाली त्याला. आज जो रंग भिंतींना दिसतो ती छटा कुठल्या डब्यातून येणार्या रंगाची नाही. हा अनेक वर्षं अनेकांनी पुसलेल्या बोटांतून, टेकलेल्या डोक्यांतून, धुरांतून तयार झालेला रंग आहे. त्या बटाट्याच्या चाळीच्या या गमतीजमती...पुलंच्या मिश्किल अंदाजामध्ये...