Baya Dar Ughad |बया दार उघड
Baya Dar Ughad |बया दार उघड
महाराष्ट्रातील समाजमनावर संतांचा,त्यांच्या जीवनप्रणालीचा, त्यांच्या वाड्मनयीन रचनांचा फार मोठा प्रभाव असल्याचे दिसून येते. या परंपरेतूनच आधुनिक मराठी वाङ्मयाची वाट ठळक होत गेलेली आहे. आजवर अनेक अभ्यासक,विचारवंतांनी या संतरचनांचा विविध दृष्टिकोनातून विचार "करून त्यावर अभ्यास करून आपली मुळे शोधण्याचा प्रयत्न केला आहे. मध्ययुगातील संतांप्रमाणे तत्कालीन संत कवियत्रींनीही विपुल प्रमाणात वैविध्यपूर्ण रचना केल्या आहेत. प्रस्तुतच्या 'बया दार उघड ' या नाटकातून अशाच काही संत स्त्रियांच्या रचना लोकांपुढे आणण्याचा प्रयत्न सुषमा देशपांडे यांनी केला आहे. "