Becket |बेकेट

Becket |बेकेट
दोन प्रबळ वृत्तींमधील संघर्ष, ह्या प्रवृत्तींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तींतील द्वंद्व हा प्रतिभावंतांना सतत लोभावणारा विषय ज्यॉं आनुई ह्या फ्रेंच नाटककाराने इंग्लंडच्या इतिहासातील दुसरा हेन्री आणि टॉमस बेकेट यांच्या परस्पर संबंधाची निवड करताना त्याला फार वेगळी डूब दिली. महत्त्वाचा भाग म्हणजे मुळात हातात हात घालून उनाडणारे हे मित्र परिस्थिती बदलताच एकमेकांचे कट्टर शत्रू कसे बनतात आणि तरीही त्यांची एकमेकांची ओढ जात नाही. ह्याच नात्यासंबंधी अनेकांनी लिहिले आहे. तरीही आनुईच्या नाटकातील नाट्य विशेष चटका लावणारे आहे.मराठी वाचकांना ही भेट शिरवाडकरांनी रूपांतराच्या किंवा स्वैर रूपांतराच्या मार्गाने करून दिली.