Begampurachya Shodhat | बेगमपुराच्या शोधात

Begampurachya Shodhat | बेगमपुराच्या शोधात
प्राच्यविद्या अभ्यासक, राष्ट्रवादी आणि हिंदुत्ववादी अशा सर्वांच्या प्रेरणा नाकारत, गेल ऑम्वेट यांनी पाच शतकांच्या कालखंडातील दडपलेल्या समाजातील द्रष्ट्या विचारवंतांच्या भूमिकेला एका जागतिक दृष्टिकोनाच्या परिप्रेक्ष्यात गुंफले आहे. हे द्रष्टे विचारवंत आहेत- चोखामेळा, जनाबाई, कबीर, रविदास, तुकाराम, कर्ताभज, फुले, इयोथी थास,पंडिता रमाबाई, पेरियार आणि आंबेडकर! गांधींचा आदर्श खेडे हा रामराज्याचा कल्पितादर्श, नेहरूंचा हिंदुत्वाची किनार असलेला ब्राह्मणी समाजवाद आणि सावरकरांचा पारंपारिक भूप्रादेशिक हिंदू राष्ट्रवाद या सर्व कल्पितादर्शांना या विचारवंतांचे दृष्टिकोन छेद देतात, त्यांचा प्रतिवाद करून मांडणी करतात.