Beiman |बेइमान

Vasant Kanetkar | वसन्त कानेटकर
Regular price Rs. 150.00
Sale price Rs. 150.00 Regular price Rs. 150.00
Unit price
Beiman ( बेइमान by Vasant Kanetkar ( वसन्त कानेटकर )

Beiman |बेइमान

About The Book
Book Details
Book Reviews

ज्याँ आनुई या फ्रेंच नाटककाराने ‘बेकेट’ ह्या आपल्या नाटकात मित्रप्रेमाचे जे वेधक चित्र रंगविले आहे त्याचे प्रतिबिंब इतर भाषांप्रमाणे मराठीतही उमटले आहे. ‘बेकेट’ चे भाषांतर वि. वा. शिरवाडकर यांनी केले, तर वसंत कानेटकर यांच्या ‘बेइमान’ चे उगमस्थान तिथेच सापडेल.उद्योगपती धनराज याला आपला बालमित्र चंदर याच्याबद्दल वाटणारे अपार प्रेम आणि आपल्याच सूचनेवरून चंदरने कामगारांचे नेतृत्व स्वीकारल्यावर दोघांमधे निर्माण झालेला संघर्ष हा या नाटकाचा केंद्रबिंदू. धनराज चंदरमधे आपले स्वरूप प्रकर्षाने पाहतो. आपले गुणदोष तो अधिक रेखीव स्वरूपात चंदरमधे शोधीत असतो. म्हणूनच याचे आत्मप्रेम आणि स्वतः विषयीचा तिटकारा याचे पर्यवसान चंदरवरील प्रेम-द्वेष अशा दुहेरी संबंधात होते हा या नाटकाचा विलोभनीय विशेष.

ISBN: 978-8-17-185180-5
Author Name: Vasant Kanetkar | वसन्त कानेटकर
Publisher: Popular Prakashan Pvt. Ltd. | पॉप्युलर प्रकाशन प्रा.लि.
Translator: -
Binding: Paperback
Pages: 96
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products