Belinda | बेलिन्दा

Belinda | बेलिन्दा
आधी असतो निव्वळ शुभ्र प्रकाश... लोलकात पकडला, तरी पलीकडे त्याचा सातरंगी पिसारा होतो. तसाच हा असण्याचा पसारा... शब्दांत व्यक्त झाला, तर अनंत काळाचेही तुकडे पडतात... भूत.. भविष्य... वर्तमान... होतात. एकसंध असणंही दुभंगतं... शरीर... मन... आत्मा... होऊन विखुरतं. माणूस का, कुठे आणि कसा भेटतो माणसाला... कधी सक्ती, कधी अपघात कधी समूह, कधी बेट, कधी गोचर, कधी धूसर... तरी अटळ नातेबंधांच्या कठीण कातळाखाली स्पष्ट ऐकू येतात काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सराचे खळाळ झरे अविरत... आणि माणूस ओळखू लागतो स्वत:लाच.असण्याचा हा पसारा शब्दांत पकडला, तर या छिन्न, भिन्न शोधाला अंत नाही... पण शब्दांच्या अलीकडे, तसाच पलीकडे मात्र निरंतर असण्याचा निव्वळ शुभ्र प्रकाश... हा अनवट माणूस ओळखण्यासाठी वाचकांनी एकदा वाचायला हवे 'बेलिन्दा'.