Bermuda Triangle | बर्म्युडा ट्रँगल

Bermuda Triangle | बर्म्युडा ट्रँगल
चालू शतकातील सर्वांत महान रहस्य! बम्युडा ट्रॅंगल १९४५ सालापासून हया! सैतानी सागरप्रदेशातील शंभराहून अधिक विमाने नि बोटी नाहीशा झाल्या! एक हजाराहून अधिक माणसं गूढपणे बेपत्ता झाली! मोठयामोठया शोध-मोहिमा राबवूनही कशाचाच काहीही मागमूस लागला नाही. हया विलक्षण घटनांमागे परग्रहावरील लोकांचा तर हात नसावा ना? अथांग समुद्रगर्भातली आपल्याला अज्ञात अशी आणखी एखादी अतिप्रगत संस्कॄती तर हया प्रकारांमागे नसेल ना? समुद्रगर्भात गडप झालेल्या, एके काळी भूपृष्ठावर अस्तित्वात असलेल्या ’अटिलीस संस्कृती’ चा तर हया घटनांशी काही संबंध नसेल ना? एक ना दोन, अशा विविध रहस्यमय गूढांची सविस्तर मीमांसा करणारे उत्कंठावर्धक, वाचनीय असे मराठीतील एकमेव पुस्तक.