Bharat Ani Jag | भारत आणि जग

Bharat Ani Jag | भारत आणि जग
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या साठ वर्षांमधल्या परराष्ट्र राजकारणाचा अप्रतिम असा आढावा भारत आणि जग या नव्या पुस्तकात ज्येष्ठ पत्रकार गोविंद तळवलकर यांनी घेतला आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निकाल, विरोधकांची विद्वेषी चालबाजी, जयप्रकाश नारायण यांनी सैन्याला सरकारी आदेश न मानण्याचे केलेले आवाहन, त्यानंतरची आणीबाणी, इंदिरा गांधी यांचा खून, राजीव गांधी यांचा शपथविधी आणि निवडणुकांना सामोरे जायचा घेतलेला निर्णय, प्रचंड बहुमतांनी कअॅंग्रेस पक्षाचा झालेला विजय, श्रीलंकेत शांती सैन्य पाठवायचा घेतलेला निर्णय, बोफोर्सच्या पाश्र्वभूमीवर कअॅंग्रेसचा झालेला पराभव, व्ही. पी. सिंग, चंद्रशेखर यांची सरकारे, इराकने कुवेतवर केलेले आक्रमण आणि भारतात अमेरिकन विमानांना इंधन भरण्यास दिलेली परवानगी, राजीव गांधी यांची ऐन निवडणुकीच्या धामधुमीत झालेली हत्या आणि सत्तेवर आलेले पी. व्ही. नरसिंहरावांचे सरकार, तसेच त्यांच्या नेतृत्वाखाली अणि डॉ. मनमोहन सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली भारतात प्रथमच आलेली खुली अर्थव्यवस्था हे क्षण इतिहासालाही न विसरता येणारे, स्पर्धात्मक परीक्षांसाठी तयारी करणारे आणि ज्यांना अशा घटनांचा आपल्या लिखाणामध्ये संदर्भ द्यायचा असतो, त्यांना हे पुस्तक म्हणजे ज्ञानकोशाची बरोबरी करणारा ग्रंथच वाटेल.