Bharat Chin Sambandhanchi Pradirgha Kheli | भारत चीन संबंधांची प्रदीर्घ खेळी
Bharat Chin Sambandhanchi Pradirgha Kheli | भारत चीन संबंधांची प्रदीर्घ खेळी
भारताचे माजी परराष्ट्र सचिव तसंच चीनमध्ये भारताचे राजदूत म्हणून काम केलेल्या विजय गोखले यांनी या पुस्तकात उभय देशांमध्ये झालेल्या वाटाघाटींचा, त्यामधील बदलांचा वेध घेतला आहे. भारत चीन यांच्यामध्ये भारतीय स्वातंत्र्योत्तर काळापासून ते आजपर्यंत सहा महत्त्वाच्या वाटाघाटींच्या खेळ्या झाल्या. या प्रदीर्घ वाटाघाटींच्या परिप्रेक्ष्यातून भारत-चीन संबंधांचा चिकित्सक ऊहापोह ते करतात, तसंच सद्यस्थितीकडेही पाहतात. "भारताशी शिष्टाईच्या पातळीवर वाटाघाटी करताना चीन कोणते डावपेच आखतो कोणत्या क्लृप्त्या लढवतो आणि कोणती साधनं वापरतो याचा शोध गोखले पुस्तकात घेतात."