Bharat Sasne Yanchya Nivdak Katha | भारत सासणे यांच्या निवडक कथा

Bharat Sasne Yanchya Nivdak Katha | भारत सासणे यांच्या निवडक कथा
कथा, कादंबरी, नाटक, बालसाहित्य इत्यादी विविध साहित्यप्रकारांत सहजपणे वावरत असले तरी भारत सासणे मुख्यत्वे ओळखले जातात ते कथालेखक म्हणून. "गेल्या पंचवीस-तीस वर्षांत त्यांनी अनेकानेक दीर्घकथा व लघुकथा लिहिल्या आहेत. मानवी मनाचा तळ शोधण्यात प्रयत्न करणारी गूढधूसर वातावरणाची निर्मिती करणारी समाजजीवनातील वेगवेगळ्या थरांमधील अपप्रवृत्तींचा वेध घेणारी अलिप्त निवेदनपद्धतीतून साकार होणारी कथा त्यांनी लिहिली आहे. सामाजिक वास्तवाचे त्यांना असणारे भान तीव्र आहे आणि माणसाच्या वेदनेवर नेमकेपणाने बोट ठेवण्याची क्षमता त्यांच्या लेखणीत आहे. त्यांच्या कथासाहित्याचे सामर्थ्य सूचित करणार्या निवडक कथांचे प्रिया जामकर यांनी जे संपादन केले आहे ते अभ्यासपूर्ण आणि साक्षेपी स्वरूपाचे आहे."