Bharatacha Bhavishyavedh : Navya Arthaniticha Shodh - Bodh | भारताचा भविष्यवेध : नव्या अर्थनीतीचा शोध - बोध

Bharatacha Bhavishyavedh : Navya Arthaniticha Shodh - Bodh | भारताचा भविष्यवेध : नव्या अर्थनीतीचा शोध - बोध
'भारताचा भविष्यवेध : नव्या अर्थनीतीचा शोध-बोध' हा ग्रंथ त्या वृत्तीचा आहे! मोकाट भांडवलशाहीच्या अथवा कठोर कम्युनिस्ट विचारसरणीच्या अशा कोणत्याही टोकाला न जाता जोशी मिश्र अर्थव्यवस्थेच्या, नियंत्रित बाजारपेठेच्या आणि नियोजनाच्या माध्यमातून भारताच्या विकासाचे चित्र रंगवतात. लेखक प्रभाकर जोशी यांनी भारताची जी आर्थिक-सामाजिक कुंडली मांडली आहे ती ग्रहतार्यांच्या स्थानावरून नाही. आपण देश म्हणून, समाज म्हणून कसा विचार करतो व कसा व्यवहार करतो. यावर आपले भविष्य ठरत असते, अशी त्यांची धारणा आहे. ती जाणीव करून देणारा हा ग्रंथ खरोखरच आपल्या पुढील मार्गक्रमणेसाठी अतिशय उद्बोधक ठरणार आहे, आपल्याला अंतर्मुखही करणार आहे !.