Bharatiya Lokshahi Shodh Ani Avhane | भारतीय लोकशाही शोध आणि आव्हाने

Bharatiya Lokshahi Shodh Ani Avhane | भारतीय लोकशाही शोध आणि आव्हाने
सर्व प्रचलित राज्यपद्धतीत, लोकशाही ही सर्वांत चांगली राज्यपद्धती समजली जाते. याचा अर्थ असा नव्हे की एकदा लोकशाही पत्करली की देशापुढील संकटाचे आणि आव्हानांचे सहजगत्या निवारण होईल. प्रत्येक देशांतील लोकशाहीला त्या त्या देशातील वास्तवाचा रंग चढतो. धार्मिक तत्वावर परंतु अर्धवट बुद्धीने देशाची फाळणी केली गेल्याने, भारतात फार मोठ्या संख्येने मुसलमान राहिले. लोकशाहीची कल्पना मुसलमानांना नवीन होती, तशीच हिंदूंनाही नवी होती. व्यक्तिस्वातंत्र्य, समान वागणूक व बंधुता ही सर्व लोकशाही मूल्ये, कोठल्याही तीव्र राजकीय झगड्याशिवाय हिंदू आणि मुसलमान समाजाने स्वीकारली का? इतिहासाच्या यथार्थ ज्ञानाचा अभाव, तात्कालिन सत्तालाभासाठी दीर्घकालिन राष्ट्रीय हिताचा बळी देण्याची घातकी वृत्ती, जात्याभिमानातून निर्माण झालेली सामाजिक बेफिकीरी या हिंदुच्या ठिकाणी असलेल्या दोषांमुळे, बहुसंख्य असूनही हिंदूंना केवळ लोकशाही राज्यपद्धती सबळ करू शकेल काय ? भारतामध्ये इहवादी शासन असे आश्वासणाऱ्या भारताच्या घटनेतच २५ व्या कलमानुसार, इहवादी शासनाचा गळा घोटण्याची तरतूद आहे तिचे काय करायचे ? मागासलेपणा हे आर्थिक न्यून समजण्याऐवजी विशेष पात्रता समजल्याने देशांत यादवीसदृश्य परिस्थिती निर्माण होते आहे, यावर उपाय काय ? भारतापुढील अशा सर्व आव्हानांचा चिकित्सक शोध घेणारा ग्रंथ.