Bharatiya Sanvidhan Ek Mayajal | भारतीय संविधान एक मायाजाल

Bharatiya Sanvidhan Ek Mayajal | भारतीय संविधान एक मायाजाल
कार्यकारी सत्तेचे विधि- मंडळातील बहुमतावर अतिरिक्त परावलंबित्व आणि त्यातून निष्पन्न होणारे शासकीय अस्थैर्य हा संसदीय पद्धतीचा उपजत आणि घटनात्मक असमतोल निर्माण करणारा गंभीर दोष होय. तो दूर करणारी तरतूद संविधानात नसेल तर यथाकाल अस्थैर्यामुळे कार्यकारी सत्ता आणि शासकीय यंत्रणा तसेच सतत घ्याव्या लागणाऱ्या निवडणुकांमुळे विधिमंडळे अकार्यक्षम होतात. त्याचा परिणाम न्यायालयीन यंत्रणेवर होऊन तीही हळूहळू पांगळी होते. संवैधानिक घटक अशा तन्हेने एका बाजूला विकलांग होत असतानाच, सहमती आणि लोकसेवा या लोकशाहीच्या खन्या अंतरंगाऐवजी जबाबदार राज्यपद्धती आणि निवडणुका या लोकशाहीच्या बाह्यांगांवर अतिरिक्त भर दिल्यामुळे भारतीय संविधानात नमूद केलेली उद्दिष्टे मृगजळाप्रमाणे फसवी ठरत आहेत. भारतीय संविधानाच्या या मायाजालाचा शोध घेणारे पुस्तक.