Bharatiya Sanvidhan Sankshipt Parichay | भारतीय संविधान संक्षिप्त परिचय

Bharatiya Sanvidhan Sankshipt Parichay | भारतीय संविधान संक्षिप्त परिचय
कोट्यवधी लोकांना स्वतःची एक ओळख देणारे भारतीय संविधान जगातील महान राजकीय संहितांपैकी एक आहे. सत्तर दशकांपूर्वी हे संविधान तयार करण्यात आलं, तेव्हापासून त्याची सहनशीलता आणि कामकाजाची पद्धत अनेकांसाठी लक्षवेधी आणि आश्चर्यकारक बाब ठरली आहे. या संक्षिप्त परिचयपर पुस्तकामध्ये माधव खोसला यांनी भारतीय संविधानाची अनेक वैशिष्ट्यं, त्यातून व्यक्त होणाऱ्या आकांक्षा आणि त्याच्याशी निगडीत वादविवाद यांवर प्रकाश टाकला आहे. संविधानाने विभिन्न राजकीय कृतिघटकांमध्ये सत्तेचं विभाजन कसं केलं? संविधानाने नागरिकत्वाचं कोणतं रूप आत्मसात केलं? आणि संविधानात बदल कसा होतो? यांसारख्या प्रश्नांची उत्तरं देताना खोसला सांविधानिक दस्तावेजाचा विलक्षण आव्हानात्मक प्रवास उलगडत जातात. जगातील सर्वांत मोठा लोकशाही देश असणाऱ्या भारतातील संविधानवादाचा सिद्धान्त आणि व्यवहार यांबद्दल वाचकांना चिंतनासाठी प्रवृत्त करणारं हे पुस्तक आहे.