Bharatrang |भरतरंग

Bharatrang |भरतरंग
'नाट्यशास्त्र' हा भरतमुनींचा ग्रंथ म्हणजे भारतीय रंगभूमीचा मूलाधार. या प्राचीन ग्रंथात 'रंग' ही संकल्पना लोकविलक्षण रीतीने मांडण्यात आली आहे. काहीशा दुर्लक्षित राहिलेल्या संकल्पनेचे असंख्य पैलू उलगडून दाखवणारे हे पुस्तक. रंग, रंगमंच, रंगभवन, रंगकर्मी अशा शब्दांमागचा मूलभूत विचार समजून घेतला म्हणजे भरतमुनींच्या विचारसूत्रांची आधुनिकता लक्षात येते आणि लोकसंपर्काच्या अभिजात माध्यमाचा तपशीलवार विचार करून सामाजिक समन्वय साधणारे द्रष्टे विचारवंत म्हणून असणारे भरतमुनींचे मोठेपण आपल्या मनावर अगदी सहज ठसते. भरतमुनींच्या 'नाट्यशास्त्रा'वर विशेषत: त्यातील 'रंग' संकल्पनेवर वेगळा प्रकाशझोत टाकणारे हे पुस्तक प्रत्येक रंगकर्मीने आवर्जून वाचायलाच हवे.