Bhartiya Sanskriti | भारतीय संस्कृती

Bhartiya Sanskriti | भारतीय संस्कृती
एका सामान्य माणसाने सामान्य जनांकरिता लिहिलेले हे पुस्तक आहे. या पुस्तकात पांडित्य नाही, विद्वत्ता नाही. शेकडो ग्रंथांतील आधार व संदर्भवचने वगैरे येथे काहीएक नाही. भारतीय संसृतीच्या आत्म्याची येथे भेट आहे. तिच्या अंतरंगाचे येथे दर्शन आहे. भारतीय संस्कृतीच्या आत्म्याची येथे भेट आहे. तिच्या अंतरंगाचे येथे दर्शन आहे. भारतीय संस्कृतीच्या गाभार्यात येथे प्रवेश आहे. "'भारतीय संस्कृती' हा शब्दसमुच्चय आपण अनेकदा ऐकतो. 'हे भारतीय संस्कृतीस शोभत नाही' 'हे भारतीय संस्कृतीस हानीकारक आहे' वगैरे वाक्ये लेखात वा भाषणात आपणांस वाचायला व ऐकायला मिळतात. अशा वेळेस 'भारतीय संस्कृती' या शब्दाचा अर्थ काय असतो? तेथे भारतीय संस्कृतीचा इतिहास अभिप्रेत नसतो; भारतीय संस्कृतीची जी एक विशेष दृष्टी ती तेथे अभिप्रेत असते. ही दृष्टी कोणती? भारतीय संस्कृतीची ही दृष्टी दाखिवण्याचा मी येथे प्रयत्न केला आहे." #NAME?