Bhartiya Vidnyanyogi | भारतीय विज्ञानयोगी

Bhartiya Vidnyanyogi | भारतीय विज्ञानयोगी
आपल्या भारत देशात आजपर्यंत अनेक विज्ञानमहर्षी, महान वैज्ञानिक, शास्त्रज्ञ व संशोधक होऊन गेले आहेत. या पुस्तकात प्राचीन, अर्वाचीन व आधुनिक काळातील काही निवडक वैज्ञानिकांची व त्यांच्या शोधांची माहिती दिली आहे. या शास्त्रज्ञांचे संशोधन कार्य साऱ्या मुलामुलींना नक्कीच प्रेरणादायी असेच आहे. या वैज्ञानिकांनी आपला थोडासाही वेळ वाया घालविला नाही. त्यांच्यापासून त्यांची अभ्यासूवृत्ती, वेळेचा सदैव सदुपयोग कसा करावा, श्रमनिष्ठा, जिद्द, चिकाटी, प्रयत्नसातत्य, नावीन्याचा शोध घेण्याची वृत्ती, ज्ञानपिपासा, कोणत्याही संकटांना धैर्याने तोंड देण्याच्या मानसिक स्थैर्याची जोपासना व विवेकाने त्यातून मार्ग काढण्याची खंबीर प्रवृत्ती आदी जीवनोपयोगी सदुणांची शिकवणही विद्यार्थ्यांना मिळेल. त्यातून त्यांच्या बुद्धीचा विकासही होईल, आपल्या शास्त्रज्ञांप्रती असलेला आदरही वाढेल नि आपल्या देशाविषयीचा अभिमानही नक्कीच वृद्धिंगत होईल यात मुळीच शंका नाही.