Bhashechi Bhingari | भाषेची भिंगरी

Dr. Nilima Gundi | डॉ. नीलिमा गुंडी
Regular price Rs. 180.00
Sale price Rs. 180.00 Regular price Rs. 200.00
Unit price
Bhashechi Bhingari ( भाषेची भिंगरी ) by Dr. Nilima Gundi ( डॉ. नीलिमा गुंडी )

Bhashechi Bhingari | भाषेची भिंगरी

About The Book
Book Details
Book Reviews

नीलिमा गुंडी यांचं 'भाषेची भिंगरी' हे पुस्तक म्हणजे एका भाषाशिबिराला जमलेल्या मुलांच्या गोष्टी आहेत. मुलांच्या रंगलेल्या गप्पागोष्टींमधून भाषेचं अद्भुत जग त्यात उलगडत गेलं आहे. त्यातून अक्षरचिन्हं, उच्चार, शब्द आणि अर्थ यांच्या नात्यातले नाना बारकावे, अभिव्यक्तीच्या वेगवेगळ्या वाटा अशा अनेक गोष्टी लक्षात येत जातात. मुलांना भाषेतल्या गमतीही कळतात, तसेच चकवेही कळतात आणि तेही पुन्हा अगदी सहजपणे व्याकरणाचा बागुलबुवा न दाखवता! मुलांच्या निरागस शंका, कविता, गाणी, गोष्टी, चित्रं, खेळ आणि भाषेच्या गाभ्याशी नेणारे कल्पक उपक्रम यात आहेतच, शिवाय शिक्षक-पालकांचा प्रसन्न सहभागही आहे. त्यामुळे हे पुस्तक भाषाशिक्षणाची सर्जनशील वाट खुली करून देतं. ही 'भाषेची भिंगरी' तिच्या उत्स्फूर्त वेगामुळे तुम्हालाही नक्कीच झपाटून टाकेल!

ISBN: 978-9-39-154733-2
Author Name: Dr. Nilima Gundi | डॉ. नीलिमा गुंडी
Publisher: Manovikas Prakashan | मनोविकास प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 140
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products