Bhatakyach Bharud | भटक्याचं भारूड

Bhatakyach Bharud | भटक्याचं भारूड
लक्ष्मण माने यांच्या विधान परिषदेतील निवडक भाषणांचा हा संग्रह आहे. भटक्या-विमुक्त जाती-जमाती, राखीव जागा, जातीयवाद, आश्रमशाळा, घटना (संविधान), आरोग्य, नामांतर, नोकरशाही, उद्योग, बाबरी मशीद, रोजगार, देवदासी, राजभाषा मराठी, स्त्रिया इ. विषयांना त्यांनी या भाषणांतून स्पर्श केला आहे. भटक्या-विमुक्तांचं समाजाकडून झालेलं शोषण, सरकारनेही त्यांच्याकडे केलेलं दुर्लक्ष, त्यांच्यासाठी काही योजना सुरू केल्या तरी त्यात होणारा भ्रष्टाचार, या लोकांची वर्गवारी करताना झालेल्या चुका आणि त्यामुळे होणारा गोंधळ, शिक्षणापासून या लोकांची जाणीवपूर्वक केलेली फारकत, गुन्हेगार जमातींविषयीचे कायदे आणि त्याचा या जमातींना होणारा त्रास, त्यांना मिळणार्या तुटपुंज्या आर्थिक सवलती, आश्रमशाळांची दुरवस्था आणि त्यांच्या बाबतीतली सरकारची उदासीनता...एकूणच भटक्या-विमुक्त जाती-जमातींच्या समस्या, सवर्णांकडून, समाजाकडून त्यांची झालेली उपेक्षा आणि त्यांच्या उद्धारासाठी काय करता येईल, याविषयीच्या उपाययोजना याकडे त्यांनी प्राधान्याने लक्ष वेधलं आहे.