Bhavsanchit | भावसंचित

Bhavsanchit | भावसंचित
अभ्यासकाचा सखोल व्यासंग, ललित लेखकाची सौंदर्यपूजक भाववृत्ती आणि तत्त्वचिंतकाची सत्यशोधकता यांचा दुर्मीळ संगम दुर्गा भागवत यांच्या वाङ्मयीन व्यक्तिमत्त्वात झालेला होता. सर्वसामान्यांच्या जनजीवनाशी त्यांचं जे अतूट नातं होतं त्यामुळे त्यांच्या विद्वत्तेबद्दल धाक न वाटता जनमानसात त्यांच्याबद्दल आपुलकीची भावना होती. मीना वैशंपायन ह्यांनी संपादित केलेल्या दुर्गाबाईंच्या चार पुस्तकांमधील लेख वाचताना याचा पुन्हा एकदा सुखद प्रत्यय येतो. 'विचारसंचित', 'भावसंचित', 'संस्कृतिसंचित' आणि 'दुर्गुआजीच्या गोष्टी' अशी ही चार पुस्तकं आहेत. आत्तापर्यंत ग्रंथबद्ध न झालेलं, विविध नियतकालिकांमध्ये विखुरलेलं त्यांचं जे स्फुटलेखन आहे, त्याचा मीना वैशंपायन ह्यांनी शोध घेतला आणि त्यातलं निवडक साहित्य वर्गीकरण करून या चार संग्रहांमध्ये समाविष्ट केलेलं आहे.या चार संग्रहापैकी भावसंचित हा एक अमूल्य संग्रह.