Bhayankar Sundar Marathi Bhasha | भयंकर सुंदर मराठी भाषा

Bhayankar Sundar Marathi Bhasha | भयंकर सुंदर मराठी भाषा
भयंकर सुंदर मराठी भाषा' हा द. दि. पुंडे यांनी हलक्याफुलक्या शैलीत लिहिलेला पहिलाच ललित-लेख संग्रह.वास्तविक भाषा ही तशी गंभीर गोष्ट; पण भाषा जितकी गंभीर गोष्ट असते; तितकीच ती एक 'गंमत-गोष्ट' देखील असते, ही गोष्ट पुंडे यांचा हा लेखसंग्रह वाचताना सहज जाणवेल. मराठी भाषेच्या अनेक गंमतीजमती पुंडे यांनी खुसखुशीत विनोदी शैलीत येथे निवेदित केलेल्या आहेत. मराठी भाषेबरोबर ती बोलणाच्या महाराष्ट्र-समाजाच्याही अनेक तऱ्हेवाईक सवयी, लकबी आणि कथाकहाण्या निवेदनाच्या ओघात पुंडे सांगत राहतात.हे पुस्तक वाचताना कधी आपण म्हणू की, 'मराठी भाषा म्हणजे एक भयंकरच प्रकरण' आहे, तर कधी असेही म्हणू की 'मराठी भाषेइतकी सुंदर नि गोड भाषा अख्ख्या जगात नाही.' हे पुस्तक वाचून झाल्यावर आपले मत होईल की आपली मराठी भाषा खरोखरीच 'भयंकर' सुंदर आहे.