Bhrahmadeshatala Khajina | ब्रह्मदेशातला खजिना

Bhrahmadeshatala Khajina | ब्रह्मदेशातला खजिना
इ. स. १८२५ हा या कांदबरीचा काळ पण ही कांदबरी ऐतिहासिक नाही. कान्होजी आंग्रे यांनी शिवाजी महाराजांची जी गलबतं वाचवली, त्यातलं एक गलबत संभाजी सुर्वे यांचं होतं. हे गलबत आपले मित्र जाधवराव यांना विकून संभाजीराव सात वर्षे बेपत्ता झाले.... अचानक त्यांचा एक तांडेल संभाजीरावांचं पत्र घेऊन येतो. त्यांनी शलाकला त्या तांडेलाबरोबर ब्रह्मदेशात बोलावलं होतं. इथून आपला `साहसवीर शलाकची साहस कथा सुरू होते. शलाक ब्रह्मदेशात कसा पोचतो, इंग्रजांच्या हल्ल्यात समुद्रात उडी कसा मारतो? ब्रह्मदेशाच्या राजाचे शिपाई त्याला कसे पकडतात?वाचूनच अनुभवावी अशी `शलाकच्या हुषारीची, युक्तिबाजपणाची ही रोमहर्षक कहाणी! भा. रा. भागवत यांच्या जादुई भाषेमुळे ही कादंबरी बालवाचकांना झपाटून टाकते.