Bhulbhulaiyya | भुलभुलैय्या

Bhulbhulaiyya | भुलभुलैय्या
भुलभुलैय्या नावाची चमत्कारच वाटावा अशी एक वास्तु लखनौला आहे. वपुंच्या ह्या संग्रहातील घसघशीत बावीस कथा म्हणजे असा चमत्कारच चमत्कार आहे पण तो चक्रातून टाकणारा नसून त्यातील मजा लुटायला लावणारा आहे. हातचे सोडून पळत्या पाठीमागे लागणे व्यर्थ आहे, जे काही आपले आहे ते आपलेच आहे हा विचार वपु ह्या सार्यातून नकळतपणे वाचकाच्या मनावर बिंबवून गेले आहेत. अगदी 'चष्मा' पासून 'बाई, बायको, कॅलेंडर'पर्यंत. "ब्रह्मदेवाचा बाप आला तरी ते शक्य होणार नाही" असे उठसूट म्हणणार्या राहूलकरांचीही कानउघडणी वपुंनी प्रत्यक्ष ब्रह्मदेवालाच करायला लावली आहे आणि त्यांच्या 'सुवर्णतुला'त कृष्ण, रुक्मिणी, सत्यभामा सारे आले आहेत.