Bhumika Ani Utsav | भूमिका आणि उत्सव
Bhumika Ani Utsav | भूमिका आणि उत्सव
या दोन लघु-कादंबर्या आहेत. 'भूमिका' या कादंबरी मध्ये प्रमुख व्यक्तिरेखांना जगताना सुखदु:खांचे ताणतणाव कसे येतात-जातात, जगता-जगता त्या कशा दमून जातात, तरीही आपापल्या समजुतीने जगण्याचे प्रयोजन शोधीत राहातात. पण सर्वांच्या वाट्याला पाहिजे ते येतेच असे नाही! हे मानवी जीवनाचे उघडे दर्शन देऊन 'भूमिका' कादंबरी संपते.दुसरी कादंबरी 'उत्सव' म्हणजे 'सरू' आणि 'मधु ' ह्या जिवलग मैत्रिणींची जीवनकथा. ह्यात दोघींच्या वाट्याला आलेले एकटेपण स्वीकारून, आयुष्य समंजसपणे जगत, अखेरीला एकुलत्या एक जन्माचे सोने कसे करता येते; हे सांगत ही कादंबरी योग्य जागी संपते!.