Bichhade Sabhi Bari Bari |बिछडे सभी बारी बारी

Bichhade Sabhi Bari Bari |बिछडे सभी बारी बारी
बांग्लातील प्रख्यात कादंबरीकार बिमल मित्र आणि चित्रपट अभिनेता आणि दिग्दर्शक, निर्माता गुरूदत्त यांची भेट त्यांच्या साहब-बीबी और गुलाम या लोकप्रिय कादंबरीवर आधारित चित्रपटनिर्मितीच्या वेळी झाली होती. काही दिवसांतच त्या दोघांमध्ये घट्ट मैत्री झाली. बिमल मित्र यांना गुरू दत्त यांच्या आयुष्यातील घटनांचे साक्षीदार होण्याची संधी मिळाली. त्या आठवणींचं प्रतिबिंब या पुस्तकात पडलेलं आहे. गुरु दत्तने आत्महत्या केली ही बातमी ऐकल्यावर बिमल मित्र यांच्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले. गुरू दत्तच्या आयुष्यात कोणत्या गोष्टीचा अभाव होता? तो इतका त्रासलेला का होता? तो इतका दु:खी का होता? तो रात्र रात्र न झोपता कशाचा विचार करीत होता? जगात सुखी होण्यासाठी ज्या गोष्टींची आवश्यकता असते त्या सगळ्या गोष्टी गुरूदत्तजवळ होत्याच. मान-सन्मान, यश, पैसा, प्रतिष्ठा, नाव, सुंदर पत्नी, गोजिरवाणी मुलं. त्याच्याकडे काय नव्हतं? असं असूनही तो इतका अस्वस्थ का होता? या पुस्तकात बिमल मित्र यांनी अनेक घटनांच्या, प्रसंगांच्या आधाराने ह्या प्रश्नांची उत्तरं शोधायचा प्रयत्न केला आहे. या प्रक्रियेतून गुरूदत्तची गायिका पत्नी गीता दत्त, वहिदा रहमान आणि गुरू दत्त यांच्यातील तणावपूर्ण संबंधांचीच उकल होते असं नाही, तर बॉलीवूडमधील जीवनाचंही विश्वसनीय दर्शन आपल्याला घडतं. गुरू दत्तविषयी प्रेम असणाऱ्या सर्वांनाच यातून एका वेगळ्याच गुरू दत्तचं दर्शन घडेल असा विश्वास वाटतो.