Bij Ankure Ankure | बीज अंकुरे अंकुरे

Bij Ankure Ankure | बीज अंकुरे अंकुरे
सुपीक माती अन् पोषक वातावरण यामुळेच बीजाला जीवनसत्व प्राप्त होतात मात्र खतांच्या (ते ही रासायनिक) अती वापरामुळे बीजं जळून जातात - सडून जातात आणि आपण मात्र वाट पाहत असतो त्यांच्या अंकुरण्याची. मुळात आपण त्यांच्या आंतरिक मुळांची क्षमताच हिरावून घेतलेली असते अन् त्यावर सतत रासायनिक फवारणी करून त्यांना कायमचं बेशुद्ध केलेलं असतं अन् त्यांनीही जमिनीत तग धरण्यासाठी, त्यांना काही संघर्ष करायचा असतो याचा मात्र आपल्याला सोयीस्कर विसर पडलेला असतो मग अंकुर कुठून फुटणार ? आपल्या पिलांना पालवी फुटावी अन् ती सदैव बहरत राहावी असं जर मनापासून वाटत असेल तर त्यांचा संघर्ष त्यांनाच करू द्या, कारण त्यांचं आयुष्य हे फक्त आणि फक्त त्यांचच आहे, ते आपलं समजण्याचा वेडेपणा करू नये.